मी तुमचे इलेक्ट्रिकल क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत करू शकतो !!! मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे. तसेच या क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले की, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.